ऑनलाइन फसवणूक कशी होते? Online Fraud

ऑनलाइन फसवणूक कशी होते? 

How does online fraud happen?

saafl finance

आपले खूप बांधव ऑनलाइन फसवणुकीचे बळी गेलेत म्हणून ही माहिती लिहितो आहे.

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.आपलेच बांधव रोज पोस्ट करत आहेत ज्याचे खात्यातून पैसे कमी झाले म्हणून.दक्षता कशी घ्यावी याबद्दल मी थोडेसे सांगतो जेनेकरून आपले बांधव फसणार नाहीत.

गुगल पे,फोनपे,पेटीएम किंवा भीम या सारख्या अप द्वारे पैश्याची फसवणूक करणे खूप सोपे आहे.

खाली सर्व माहिती देतो नीट वाचुन घ्या...


जे तुमची फसवणूक करण्यासाठी तुम्हाला कॉल करतो त्याला आपण 'चोर' म्हणू..

1.चोर तुम्हाला आधी कॉल करतो आणि तुम्हाला अस पटवून सांगतो की तो तुमच्या बँक मधून बोलतोय. तो बँक चे नाव बरोबर घेतो करण त्या च्या जवळ तेवढी माहीत असते तुमच्या बदल.

2. फोनपे,गुगलपे,पेटीएम भीम सारख्या यु.पी.आय ऍप द्वारे चोरी----

तुम्हाला बार कॉड पाठवून ते स्कॅन करून आकडा टाकून घेतला जातो,अर्थातच यात तुम्ही स्वतः त्याला पैसे पाठवत आणि चोरी करायला मदत करता. हे खूप चालखीने तुमच्या कडून करवून घेतले जाते.

तुम्हाला चोर सांगेल की त्याने पाठवलेला बार कोड स्कॅन करा आणि 9999 हा आकडा टाका म्हणजे तुम्हाला काहीतरी बक्षीस म्हणून पैसे भेटतील, पण तुम्हाला हे समजल पाहिजे की 9999 एवढे पैसे तुम्हीच त्याला पाठवताय.

चोर तुम्हाला कॉल करून काहीतरी लालूच देऊन ऑनलाइन वेबसाईट वर तुमचा upi टाकायला सांगेल, याठिकाणी वेबसाईट वर जेव्हा तुम्ही यूपी आई टाकता आणि फोन वर आलेले नोटिफिकेशन मध्ये येस वर क्लिक करा तेव्हा तुम्ही त्या चोराला स्वतःच पैसे चोरायला मदत करताय हे लक्षात घ्या.

फोनपे,पेटीएम,गुगल पे,भीम वर नोटिफिकेशन आले असेल तर व्यवस्तीत तपासूनच त्याला ओपन करा आणि जर ओपन केले तर  नीट बघा की कुणी पैसे request करत आहे का?

अनोळकी फोन नंबर किंवा युपी आई आयडी वरून पैसे पाठवण्याची request आली असेल तर तिला स्वीकार करू नका

चार्मोद्योग आणि चर्मकार विकास : ५० टक्के अनुदान योजना

विनाकारण कुठेही तुमचा मोबाइल नंबर देऊ नका

2.एटीम कार्ड मार्फत फसवणूक कशी होते?

याठिकाणी पन तुम्हाला तो चोर कॉल करतो आणि तुमच्या बँकेतुन बोलतोय अस सांगतो.

तुम्हाला काहीतरी भुरळ घालून तुमचा कार्ड नंबर घेतो, कार्ड नंबर घेऊन तो तिकडे स्वतः त्याचा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापर करतो. परदेशात ऑनलाइन पैसे खर्च करण्यासाठी otp लागत नाही तेव्हा तो कार्ड नंबर वापरून पैसे काढू शकतो.

जर otp लागत असेल तर तुम्हाला काहीतरी भुरळ घालून तो तुमचा otp तुमच्याकडून काढून घेतो. लक्षात घ्या कोणतीही बँक तुम्हाला कॉल करून फोनवर otp आणि कार्ड नंबर मागत नाही. कार्ड च्या मागे cvv नंबर असते ते कोणालाही देऊ नये आणि आपली एटीएम पिन सुद्धा कुणाला सांगू नये.
कुठल्याही गैर वेबसाईट वर आपले कार्ड नंबर टाकून खरेदी करू नये.

लॉटरी लागली,तुमच्या अकाउंट वर पैसे टाकतो आशा भुरळ देऊन तुमच्या कडून पैसे काढून घेतले जातात
फोन मध्ये कुठलेही अँप विनाकारण ठेवू नका,आणि प्रत्येक अँप ला फोन मध्ये कोणत्या परवानग्या दिल्या आहेत हे तपासून घ्या, जसे की तुमचे कॉन्टॅक्ट वाचण्यासाठी प्रत्येक अँप ला तुम्हाला कॉन्टॅक्ट ची परवानगी द्यावी लागते. तश्याच प्रकारे एखादे ऍप दुसऱ्या खूप परवानग्या मागत असेल तर देऊ नका.
गुगल प्ले सोडून दुसरीकडून कुठूनही ऍप डाउनलोड करू नका...

काही शंका असतील तर मला कमेंट मध्ये विचार मी जमेल ती माहीत देइन...!

परत एकदा सांगतो कुठलीही बँक फोन करून तुम्हाला तुमच्या एटीएम कार्ड चा नंबर, पिन नंबर, otp विचारत नाही तेव्हा फोन करून तुम्हाला कुणीही ही माहिती विचारत असेल तर देऊ नका.
गुगलपे किंवा फोनपे ने कुठलेही अनोखी बारकोड स्कॅन करू नका....

दक्ष रहा, सुरक्षित रहा

कागल तालुका उद्योजक संघ-आजच संघात मोफत जवोईन व्हा.

आमच्या व्यवसाय व उद्योग विषयी माहिती देणाऱ्या ग्रुप ला ज्वॉइन व्हा मोफत 

CONVERSATION

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

Your massage recorded.

Back
to top