I P O एक आत बट्ट्यातील डील... सावध व्हा!

झोमॅटो , पेटीम यांचे आयपीओ : तोट्यातील कंपन्यांना भरपूर प्रीमियम !

बँकिंग प्रणाली आणि भांडवली बाजार दोन्ही संस्था समाजातील ठेवी गोळा करून उद्योगधंद्यासाठी देतात ; पण सामान्य बचतदारांच्या दृष्टिकोनातून दोघात एक महत्वाचा फरक आहे 

बँकिंग प्रणाली गुंतवणुकी / कर्ज देण्यातील जोखीम स्वतः शोषते तर भांडवली बाजारात (आयपीओ) सामान्य गुंतवणूकदारानी डायरेक्ट / स्वतः जोखीम घेणे अनुस्यूत असते 

भांडवल उभारणी करणाऱ्या कंपन्यांनी बचतदार नागरिकांना फसवू नये म्हणून काही वर्षांपूर्वी पब्लिक इश्यू काढण्यासाठी कंपन्यांनी किमान तीन वर्षे नफा कमावलेला असणे हि पूर्वअट होती 

ती अट आता नाही ; तोट्यातील कंपन्या पब्लिक इश्यू काढू शकतात ; कोणी केला हा बदल ? का केला ? त्याचे लाभार्थी कोण ? हे प्रश्न मनात येणे म्हणजे राजकीय विचार करणे !

_______________

झोमॅटोचा २ रुपयांचा शेअर ७६ रुपयांना विकणारा आयपीओ तुफान यशस्वी झाला ;

झोमॅटोने गेल्या तीन वर्षात अनुक्रमे ८०० कोटी , २४०० कोटी आणि १००० कोटी रुपये तोटा केला होता (संचित तोटा ४६०० कोटी)

आता पेटीएम चा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ (१८००० कोटी) येऊ घातला आहे ; फक्त १ रुपया फेस व्हॅल्यू असणारा शेअर २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला जाणार आहे 

पेटीएमचा गेल्या २ वर्षातील तोटा अनुक्रमे २९०० कोटी आणि १७०० कोटी आहे 

तोट्यातील कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रीमियमला विक्री होणे हे फक्त भारतातच घडत नाहीये , सर्वच देशात घडत आहे ; 

कारण वित्त भांडवल खऱ्या अर्थाने जागतिक आहे ; ते कधीच फक्त एका देशावर राज्य करत नाही , ते एकाचवेळी साऱ्या देशांवर राज्य करते 
_________________

पूर्वीच्या काळात लोखंडाचे रूपांतर सोन्यात करू शकणारे किमयागार / अल्केमिस्ट होते असे म्हणतात 

आताच्या वित्तयुगात तोट्याचे रूपांतर भरघोस नफ्यात करून देणारे जादुई वित्त रसायन शास्त्रज्ञ साऱ्या जगावर छाउन राहिले आहेत 
_____________

जुगारी ज्यावेळी जुगाराच्या अड्यावर जुगार खेळतात त्यावेळी स्वतःचे पैसे वापरतात आणि आपापसात खेळतात , हरतात, जिंकतात , मरतात , एक दुसऱ्याला मारतात 

स्टॉक मार्केट मध्ये सट्टेबाजी होते , मान्य. पण स्टॉक मार्केट समाजातील लाखो कोटी रुपयांच्या ठेवी वापरते आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे स्टॉक मार्केटच्या लॉजिकच्या मागे देशाची अर्थव्यवस्था फरफटत नेते 

स्टॉक मार्केटला  डाव्या नैतिक शुद्धवादी अहंगडातून शेलकी जजमेंटल विशेषणे लावल्यामुळे ना त्याचा अभ्यास करायची मानसिकता तयार झाली ना सामान्य नागरिकांचे राजकीय शिक्षण करण्याची कुवत तयार झाली ; त्यामुळे खूप नुकसान झाले आहे 

संजीव चांदोरकर (२९ ऑक्टोबर २०२१) 
स्क्लोजर: मी स्टॉक मार्केटचा राजकीय टीकाकार आहे , स्टॉक मार्केटच्या संकल्पनेत अनैतिक काही नाही. मी स्वतः शेअर्समध्ये देखील गुंतवणूक करतो

CONVERSATION

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

Your massage recorded.

Back
to top