शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शासन निर्णय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज
ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज
- ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई, दि. २ : ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या एका आदेशान्वये ग्रामस्थांच्या मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली होती. पण आता हा आदेश रद्द करण्यात येत असून त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनामुळे सध्या सर्वच जण अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरीक, शेतकरी, विद्यार्थी आदीजण वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जण घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतात. पण ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये अशा प्रकारे घरांचे मालकीहक्क दर्शविणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामुळे ग्रामस्थांना या पद्धतीने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आपल्या कर्जाच्या बोजाची नोंद होत नसल्यामुळे बँका, पतसंस्था यांच्याकडूनही कर्ज नाकारण्यात येत आहे. त्यामुळे आता हा शासन आदेश रद्द करुन नमुना ८ वर बँका, पतसंस्था आणि इतर अधिकृत वित्तीय संस्थांना कर्जाचा बोजा चढविण्यास अनुमती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या संस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, केंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी स्वामीत्व योजना हाती घेतली असून सर्व गावांची ड्रोनद्वारे मोजणी होऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहेत. पण तोपर्यंत पूर्ववत ग्रामपंचायत नमुना ८ मालकीहक्क दर्शविणारे मालमत्ता कर आकारणी पत्रकावर बँका, पतसंस्था आणि इतर परवानगी असलेल्या अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांचे बोजा नोंद करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने आज घेतला आहे. यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
येथे देखील भेट द्या
About Me
SAAFL, Financial Consultant Firm is designed with a unique concept for the Advisory and Consults Professionals. We believe the way we have used our technology will help everyone to meet their financial requirement in just one click. Being a Financial company we have provided a single platform where the customer will get access to all kind of loan products i.e Personal Loan, Business Loan, Home Loan, Mortgage Loan.
लोकप्रिय पोस्ट
-
गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे,...
-
गृह कर्ज किंवा गृह तारण कर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात. याची पूर्तता जितक्या लवकर करणार तितक्या लवकर कर्ज मिळणार. पती आणि पत्नी किंवा ज...
Calculate Your Salary Free
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे,...
फेसबुकसाठी आम्हाला लाईक करा
विभाग
- अर्थ
- अर्थकारण
- उद्योग
- कर्ज
- कागदपत्रे
- गुगल पे
- गृह कर्ज
- जाहिरात
- टॅक्स
- डेडलाईन
- पैसा
- फोन पे
- रजिस्ट्रेशन
- राज्य
- शासन निर्णय
- शेतकरी
- Advertise
- Agro
- annsaheb aarthik mahamandal yojana
- Business
- Earn
- Economy
- featured
- Government Schemes
- Govt. Scheme
- guravloan
- Guravsamajloan
- International
- IPO
- ITR
- Jobs
- loans
- obcmahamandalloan
- RBI
- State
- Subsidy
- Success Stories