संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

 

guravsamajmahamandal

गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्य सरकार गुरव समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल. ओ.बी.सी. महामंडळाच्या अंतर्गत संत काशिबा युवा विकास योजना सुरू करून त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रू.५०कोटींचे भांडवल देण्यात येईल व निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.09 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.04.12.2023 रोजी (कंपनी अधिनियम 2013) गुरव समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.



अर्थ #Guravsamajloan #guravloan #obcmahamandalloan #loanforguravsamaj  #santkashibagurav

CONVERSATION

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

Your massage recorded.

Back
to top