चार्मोद्योग आणि चर्मकार विकास : ५० टक्के अनुदान योजना

charmkarunnatiyojanaby maha gov saafl

संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ

स्थापना व उद्देश

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 1 मे, 1974 रोजी कंपनी अधिनियम 1956 अनुसार करण्यात आली. या महामंडळात विविध चर्मवस्तू उत्पादित करुन सदरच्या वस्तू शासकीय, निमशासकीय विभागांना पुरवठा करण्यात येतात.

ध्येय

अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.

५० टक्के अनुदान योजना

अ.क्र.योजनासविस्तर माहिती
१७.१योजनेचे नांव५० टक्के अनुदान योजना
योजनेचा प्रकारराज्य शासनाच्या योजना
योजनेचा उद्देशअनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांवअनुसूचित जातीतील चर्मकार समाज.
योजनेच्या प्रमुख अटी
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • (ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
दिल्या जाणाया लाभाचे स्वरुपया योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु.५०,०००/ पर्यंत गुंतवणूक असणाया व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य दिले जाते. या अर्थ सहाय्यापैकी रु. १०,०००/ कमाल मर्यादेपर्यंत ५० टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित ५० टक्के कर्जाची परतफेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे परतफेड करावी लागते. बँकेकडून या योजनेखाली मिळणाया कर्जावर द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के दराने व्याज आकारले जाते.
अर्ज करण्याची पध्दत
  • अर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
योजनेची वर्गवारीरोजगारनिर्मिती
संपर्क कार्यालयाचे नांवसोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.

५० टक्के अनुदान योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)

अ.क्र.वर्षखर्चलाभार्थी
२०१२१३६२.२८६२४
२०१३१४४७.२४४७५
२०१४१५३५.२५३५३



संपर्क : 

श्री आई अंबाबाई फायनांशियल लैडर 
८२० ८९४ ८८ ९६ 

CONVERSATION

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

Your massage recorded.

Back
to top