Government Schemes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Government Schemes लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
चार्मोद्योग आणि चर्मकार विकास : ५० टक्के अनुदान योजना
संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ
स्थापना व उद्देश
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 1 मे, 1974 रोजी कंपनी अधिनियम 1956 अनुसार करण्यात आली. या महामंडळात विविध चर्मवस्तू उत्पादित करुन सदरच्या वस्तू शासकीय, निमशासकीय विभागांना पुरवठा करण्यात येतात.
ध्येय
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.
५० टक्के अनुदान योजना
अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
१७.१ | योजनेचे नांव | ५० टक्के अनुदान योजना |
२ | योजनेचा प्रकार | राज्य शासनाच्या योजना |
३ | योजनेचा उद्देश | अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात. |
४ | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अनुसूचित जातीतील चर्मकार समाज. |
५ | योजनेच्या प्रमुख अटी |
( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
|
६ | दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप | या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु.५०,०००/ पर्यंत गुंतवणूक असणाया व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य दिले जाते. या अर्थ सहाय्यापैकी रु. १०,०००/ कमाल मर्यादेपर्यंत ५० टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित ५० टक्के कर्जाची परतफेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे परतफेड करावी लागते. बँकेकडून या योजनेखाली मिळणाया कर्जावर द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के दराने व्याज आकारले जाते. |
७ | अर्ज करण्याची पध्दत |
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
|
८ | योजनेची वर्गवारी | रोजगारनिर्मिती |
९ | संपर्क कार्यालयाचे नांव | सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे. |
५० टक्के अनुदान योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)
अ.क्र. | वर्ष | खर्च | लाभार्थी |
---|---|---|---|
१ | २०१२१३ | ६२.२८ | ६२४ |
२ | २०१३१४ | ४७.२४ | ४७५ |
३ | २०१४१५ | ३५.२५ | ३५३ |
संपर्क :
श्री आई अंबाबाई फायनांशियल लैडर
८२० ८९४ ८८ ९६
सर्व शेतकरी बांधवांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC)...
सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची योजना आहे तरी सर्व शेतकरी लोकं पर्यंत ही माहिती पोचवावी.
💳💳 किसान क्रेडिट कार्ड (KCC)...💳💳💳
शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज...
१ लाख ६० हजार
४ टक्के दराने ३ लाख पिककर्ज
कृषी शेतकरी सन्मान योजना
Ministry of Agriculture and Farmers Welfare
किसान सन्मान निधी
(PM-KISAN)
संपूर्ण तालुक्यातील किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे फॉर्म भरणे चालू आहे.
ज्या शेतकरी बांधवांना
किसान सन्मान निधी (PM -KISAN) अंतर्गत
प्रती महिना 2000 /- मिळत आहेत त्या शेतकर्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी.
शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर पीक कर्जा व्यतिरिक्त १ लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.
● किसान क्रेडिट कार्डचा फायदा शेतकर्याला कर्जासाठी कोणतेही कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही व बँकेत चकरा मारण्याची गरज नाही.
● महत्वाचे म्हणजे PM KISAN लाभर्थ्यांना क्रेडिट कार्ड दरम्यान १ लाख ६० हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज क्रॉप लोन तसेच पशुपालन,कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसायासाठी मिळणार आहे.
या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना ५० आणि ७५ टक्के अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भागभांडवल किसान क्रेडिट कार्ड द्वारे मिळणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड (KCC) विषयी थोडक्यात माहिती...
(१) आपल्याकडे शेतीसाठी जमीन असल्यास आपण आपली जमीन तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. त्याची मर्यादा एक लाख रुपये होती. पण आता आरबीआयने हमी नसलेल्या कृषी कर्जाची मर्यादा १.६० लाख रुपये केली आहे.
(२) पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनातील शेतकर्यांना देखील आता केसीसीच्या माध्यमातून दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या मर्यादेपर्यंत ४ टक्के व्याज दराने लाभ मिळणार आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना सावकारांकडून मुक्ती मिळेल.
(३) सध्या देशात ७,०२,९३,०७५ शेतक्यांकडे केसीसी आहे. केसीसी अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने बँकांच्या मदतीने शेतकऱ्यांचा केसीसी बनविण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्याअंतर्गत अर्ज सुलभ केला गेला आहे आणि फॉर्म मिळलेल्या दिवसाच्या १४ दिवसांच्या आत केसीसी जारी करण्याच्या आदेशाचा समाविष्ट केला आहे.
(४) शेतकऱ्यांसाठी केवळ ४ टक्के दराने पैसे देण्यासाठी जे किसान कार्ड बनविले जाते, त्याला बनविण्यासाठी लागणारी सर्व प्रोसेसिंग फी, इंस्पेक्शन आणि लेजर फोलियो शुल्क रद्द केले आहे. जर एखादी बँक अद्याप शेतकर्याकडून हा शुल्क वसूल करते तर त्यावर कारवाई केली जाऊ शकते. या कार्डच्या माध्यमातून ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तसेच पूर्वी १ लाखांचे कर्ज गॅरंटीशिवाय दिले जात होते, जे आता १.६० लाख रुपये केले गेले आहे.
4 टक्के दराने कृषी कर्ज कसे मिळवावे :
दरम्यान, शेतीचे व्याज दर ९ टक्के आहे. पण त्यात सरकार २ टक्के अनुदान देते. अशा प्रकारे ते ७ टक्के करते. पण वेळेवर परत केल्यावर तुम्हाला ३ टक्के अधिक सूट मिळते. अशा प्रकारे त्याचा दर प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी फक्त ४ टक्के आहे. कोणताही सावकार इतक्या स्वस्त दरावर कर्ज देऊ शकत नाही. अश्या परिस्थिती तुम्हाला कर्ज हवे असल्यास बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड बनवून शकता. त्याअंतर्गत तुम्हाला ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
संपर्क :
8208948896
एसएमएस से भर सकेंगे जीएसटी रिटर्न !
एसएमएस से भर सकेंगे जीएसटी रिटर्न !
नई दिल्ली : सरकार ने शून्य मासिक जीएसटी (वस्तु एवं सेवा कर) रिटर्न भरने वाले करदाताओं के लिए एसएमएस सेवा शुरू की है. इससे करीब 22 लाख छोटे व्यापारियों को फायदा होगा. केंद्रीय अप्रत्यक्ष कर और सीमा शुल्क बोर्ड (सीबीआईसी) ने एक बयान में कहा, ''करदाताओं की सुविधा के लिए बड़ा कदम उठाते हुए सरकार ने सोमवार से उन्हें एसएमएस के जरिये जीएसटीआर-3बी फॉर्म में शून्य जीएसटी मासिक रिटर्न भरने की अनुमति दे दी है.''
अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत
अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत
कुक्कुटपालन केवळ छंद किंवा पूरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने एक व्यक्ती थोड्याच पक्षांचे संगोपन करु शकेल. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने मोठ्या प्रमाणात पक्षांचे संगोपन केल्यास त्यापासून निश्चितपणे अपेक्षित लाभ मिळण्यास मदत होईल. या उद्देशाने नोंदणीकृत आदिवासी बचतगटांना कुक्कुटपालन स्थापन करुन प्रशिक्षण देण्याची योजना मंजूर करण्यात येत आहे.
केंद्रवर्ती अर्थसंकल्प सन 2017-18 अंतर्गत रु. 20 लाख रक्कमेच्या अनुसूचित जमातीच्या बचतगटांना कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास या योजनेस मान्यता मिळाली. सदर योजनेतून प्रती बचतगट 5 लाख रुपये अनुदान मंजूर करण्याच्या प्रस्तावित आहे. सदर योजना ही गट अ मध्ये मंजूर करण्यात आलेली असून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागाचा दि. 23 जून 2013 च्या शासन निर्णयानुसार अ गटातील मंजूर योजनेसाठी आदिम जमातीच्या लाभार्थ्यांच्या बचतगटांना 100% टक्के अनुदान देय असून इतर आदिवासी लाभार्थ्यांच्या बचतगटांना 85%टक्के अनुदान देय आहे. जव्हार, वाडा, विक्रमगड व मोखाडा या तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील एका बचतगटाची निवड करण्यात येईल.
ही योजना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्यामार्फत राबविण्यात येईल. मंजूर योजना राबविण्याच्या अनुषंगाने बचतगटांना कुक्कुटपालन बांधकाम करणेकरिता निधी वितरित करतील. पात्र बचतगटांची निवड केल्यानंतर पोल्ट्री (कुक्कुटपालन) फार्मच्या शेड बांधकामाकरिता अनुदेय रक्कमेच्या रक्कमेतून खालील प्रमाणे निधी वितरित करतील, बचतगटांची निवड झाल्यानंतर 20%टक्के रक्कम, प्लींथपर्यंत व दोन्ही बाजूचे भिंतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर 20% टक्के रक्कम, जाळी व छताचे पत्रे व लोखंडी अँगल/लोखंडी पोल खरेदीसाठी 50% टक्के रक्कम पोल्ट्री (कुक्कुटपालन) फार्मच्या शेड बांधकाम योजनेच्या निकषाप्रमाणे पूर्ण झाल्याबाबत पशुधन विकास अधिकारी व बांधकाम खाते यांचा तांत्रिक दाखला प्राप्त झाल्यावर उर्वरित 10% टक्के रक्कम जिल्हा पशु संवर्धन अधिकारी नामांकित एजेंसी (उदा. सगुना, व्यंकटेश, गोदरेज इत्यादी) यांच्याकडून पक्षी, अनुषंगिक साहित्य व पशु खाद्य इत्यादी बाबत दर मागवून तुलनात्मकदृष्ट्या ज्यांचे दर कमी आहे अशा दरांना गठीत समितीची मान्यता घेऊन पक्षी, अनुषंगीक साहित्य व पशुखाद्य तयार करुन बचतगटात देतील. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे योजनेसाठी निवड केलेल्या बचतगटातील सर्व सभासदांना 15 दिवसांचे प्रशिक्षण व पोल्ट्री (कुक्कुटपालन) व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण त्यांच्या देतील व तसे शासनाचे प्रमाणपत्र सदर बचत गटातील सदस्यांना प्रदान केले जाईल. त्यासाठी प्रती बचतगट कमाल रु.37,500/- एवढा खर्च अनुज्ञेय राहिल. उपरोक्त अनुदान अदा करतेवेळी स्वयंसहाय्यता बचतगटाचे नावे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात जमा करण्यात येईल. जिल्हा पुशसंवर्धन अधिकारी पालघर नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांकडून स्थानिक वर्तमानपत्रात तसेच विविध मार्गाने जाहिरात करुन विहित नमुन्यात प्रस्ताव/अर्ज प्राप्त करतील. प्राप्त अर्जाची छाननी करुन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांनी नेमलेल्या खालील समितीस सादर करुन समितीच्या मान्यतेने निवड करतील. प्रकल्प अधिकारी, जव्हार अध्यक्ष, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (विकास) :- सदस्य, संबंधीत तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी :- सदस्य, संबंधीत तालुक्याचे आदिवासी विकास निरीक्षक :- सदस्य जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी :- सदस्य सचिव.
योजनेच्या अटी व शर्ती :- 1) बचतगट हे नोंदणीकृत असावेत. 2) बचतगटातील सर्व सभासद हे आदिवासीच असावेत. 3) बचतगटातील कमीत –कमी एका लाभार्थ्याकडे त्यांच्या नावे किमान 1 एकर जमीन, बारमाही पाणी, वीज इ. सुविधा असणे आवश्यक आहे. 4) कुक्कुटपालनासाठीचे क्षेत्र/ जमीन बचतगटांना किमान 5 वर्ष वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालक व बचतगटातील सर्व सदस्य यांनी रु. 100 च्या स्टॅम्प पेपरवर रजिस्टर हमी पत्र द्यावे लागेल. यासाठी आवश्यकतेनुसार जमीन मालकास मोबदला म्हणून बचतगटाने ठरविल्यानुसार भाडे करार करावा. 5)बचतगटाकडे बँकेकडे असलेल्या खात्यातील व्यवहार हा चालू असलेला असावा. 6) बचतगटास अनुज्ञेय असणारी अनुदानाची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यावरच दिली जाईल. अनुदानाची रक्कम रोखीने देता येणार नाही. 7) सदर योजनेचे काम बचत गटामार्फत व्यवस्थित चालू ठेवण्यात येईल. तसेच बचतगटाच्या सभासदांमध्ये कोणताही वाद विवाद होणार नाही याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना 100/- च्या स्टॅम्पपेपरवर हमी पत्र करुन द्यावे लागेल. 8) बचतगटास देण्यात आलेले कुक्कटपान हे भाड्याने देता येणार नाही अथवा विकता येणार नाही. त्याबाबत बचतगटास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना रु. 100/- च्या स्टॅम्पपेपरवर हमी पत्र द्यावे लागेल. 9) सदर बचतगटास मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाचा त्रैमासिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांना सादर करावा लागेल. 10) सदर योजनेसाठी मंजूर लक्षांकाप्रमाणे पात्र बचतगट न मिळाल्यास लक्षांक वर्ग करणे अथवा कमी करणे याबाबतचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास, जव्हार यांना राहिल. 11) बचतगटास व्यवसायाच्या जागी खालीलप्रमाणे शेडच्या दर्शनी भागावर मार्बल टाईल्स वर फलक लावणे बंधनकारक राहिल. 12) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी सदर योजनेपासून उत्पादित होणाऱ्या कोंबडीचे (मांस) आश्रमशाळा/वसतीगृहातील विद्यार्थ्यांकरिता पुरवठ्याबाबत विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सदर बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे. 13) जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्रकल्पाची छायाचित्रांसह यशोगाथा तयार करणे तसेच योजने विषयी सर्व माहिती उदा. बचतगटांची यादी, कुक्कुटपालनाचे फोटो यशोगाथा प्रकल्प कार्यालयास सादर करण्यात यावी.
सदर योजनेचे पर्यवेक्षण प्रकल्प कार्यालयातील आदिवासी विकास निरीक्षक, तसेच संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्यामार्फत केले जाईल.
- जिल्हा माहिती कार्यालय, पालघर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
येथे देखील भेट द्या
About Me
SAAFL, Financial Consultant Firm is designed with a unique concept for the Advisory and Consults Professionals. We believe the way we have used our technology will help everyone to meet their financial requirement in just one click. Being a Financial company we have provided a single platform where the customer will get access to all kind of loan products i.e Personal Loan, Business Loan, Home Loan, Mortgage Loan.
लोकप्रिय पोस्ट
-
गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे,...
-
गृह कर्ज किंवा गृह तारण कर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात. याची पूर्तता जितक्या लवकर करणार तितक्या लवकर कर्ज मिळणार. पती आणि पत्नी किंवा ज...
Calculate Your Salary Free
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना
गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे,...
फेसबुकसाठी आम्हाला लाईक करा
विभाग
- अर्थ
- अर्थकारण
- उद्योग
- कर्ज
- कागदपत्रे
- गुगल पे
- गृह कर्ज
- जाहिरात
- टॅक्स
- डेडलाईन
- पैसा
- फोन पे
- रजिस्ट्रेशन
- राज्य
- शासन निर्णय
- शेतकरी
- Advertise
- Agro
- annsaheb aarthik mahamandal yojana
- Business
- Earn
- Economy
- featured
- Government Schemes
- Govt. Scheme
- guravloan
- Guravsamajloan
- International
- IPO
- ITR
- Jobs
- loans
- obcmahamandalloan
- RBI
- State
- Subsidy
- Success Stories