गुंतवणूक आणि बचत यातील फरक व वैशिष्ट्ये यांची ओळख
आमच्या सोबत पैसा मिळवा
गुंतवणूक आणि बचत यातला मुख्य फरक दोघांच्या वैशिष्टय़ामध्येच असतो.
ही वैशिष्टय़ं जरी समजून घेतली तरी गुंतवणूक आणि बचतीविषयीचे गैरसमज दूर होऊ शकतात.सर्वासाठीचं समान साधन ‘गुंतवणूक’
१. गुंतवणूक करणं म्हणजे जुगार खेळणं नव्हे. तो नशिबाचाही खेळ नाही. गुंतवणूक ही तुम्ही तुमच्या पैशाला कसे कामाला लावता याची गुणवत्ता आणि धोरण या आधारावर तयार केलेली प्रक्रिया आहे.२. तुम्ही ठरवूनच टाकलं असेल की, गुंतवणूक म्हणजे फक्त धोकाच आहे, तर तुम्हाला नेहमी तसंच वाटत राहील; पण प्रत्यक्षात तसं नाही. गुंतवणूक तुम्हाला कितीतरी अधिक पटीनं परतावा देत असते. साहजिकच त्यात काही धोके, अनिश्चितता संभवतात. परंतु त्यासाठी तुम्हाला सदैव दक्ष, जागरूक राहणं गरजेचं आहे. शिवाय गुंतवणुकीसाठी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात धोक्याची शक्यता अल्प असते.
३. गुंतवणुकीमुळे तुमचा पैसा वाढत राहतो; पण हा झटपट श्रीमंत बनण्याचा फॉम्यरुला अजिबातच नाही. काही कंपन्यांकडून निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून अशी आमिषे दाखवली जात असतील, तर नक्की काही तरी घोटाळा आहे, हे समजावं.
४. गुंतवणूक सर्वासाठी असते. त्यात श्रीमंत-गरीब असा भेदभाव नसतो. चलन फुगवटा, चलनवाढीचा परिणाम गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण नागरिकांवर जसा सारखाच होतो, अगदी तसंच गुंतवणुकीचं आहे. चलन फुगवटय़ाचा बीमोड करण्यासाठी, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गुंतवणूक हे साधन किंवा अस्त्रही सर्वासाठी समान आहे. त्याचा सर्वानाच उपयोग करता येतो.
५. प्रारंभी नमूद केल्याप्रमाणो गुंतवणूक ही बचतीसारखी नाही. बचत हा गुंतवणूक प्रक्रियेतील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी बचत असणं अत्यंत आवश्यक असतं.
गरज असेल तेव्हा धावून येणारी ‘बचत’ :-
१. बचत म्हणजे भविष्यात उपयोग करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडच्या पैशांमधून बाजूला काढलेला एक भाग होय.२. हा बाजूला काढून ठेवलेला पैसा म्हणजे बचत. ती तुम्ही केव्हाही, गरज वाटेल तेव्हा वापरू शकता. हा पैसा तुमच्या खिशात एखाद्या प्रवाहाप्रमाणो कधीही अवतरू शकतो.
३. गरज असेल तेव्हा कधीही तुमच्या बचत खात्यातील पैसा तुम्हाला उपलब्ध करून देणं हे बॅँकेचं कर्तव्य आहे. त्यासाठी बॅँकेकडे पैसा असणंही गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बॅँकेत ठेवलेल्या पैशाचा उपयोग बॅँक नफ्याच्या उद्देशानं दीर्घकाळासाठी करू शकत नाही.
४. त्यामुळेच बचतीवरील व्याज अन्य तुलनेत नेहमी कमी असतं.
सारख्या वाटणाऱ्या मार्गातली वेगळी वळणं :-
१. गुंतवणूक म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पैशाच्या वाढीसाठी केलेली प्रक्रिया असते. एका ठरावीक मुदतीसाठी, कालावधीसाठी हा पैसा त्या-त्या कंपनी वा संस्थेच्या ताब्यात असतो किंवा त्यांच्याकडे बंदिस्त असतोमानसिक गुलामीतून सुटका हवी असेल तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवावेच लागेल :- अमरसिंह राजे