‘आयटीआर-४’मध्ये काय ?
‘आयटीआर-४’मध्ये काय ?
आयटीआर-४ (सुगम) मध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, आर्किटेक्ट, इंटेरिअर डेकोरेटर, तांत्रिक सल्लागार, अंतर्गत सजावटकार, अधिकृत प्रतिनिधी, चित्रपट कलाकार, कंपनी सचिव आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. अधिकृत प्रतिनिधीचा अर्थ कोणतीही व्यक्ती, जो एखाद्याचे प्रतिनिधित्व करतो, फी किंवा मोबदल्यासाठी, कोणत्याही कायद्यांतर्गत कोणत्याही न्यायाधिकरण किंवा प्राधिकरणासमोर. चित्रपट कलाकारांमध्ये निर्माता, कॅमेरामन, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, कथालेखक, पटकथा लेखक आदी. मुळात कोणतीही व्यक्ती जो त्याच्या व्यावसायिक क्षमतेत सामील आहे. एकूण निर्देशित वीस व्यावसायिकांना मिळणारे ढोबळ सेवाशुल्क इतर स्त्रोतापासून मिळणाऱ्या उत्पन्नासह ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नसल्यास, कलम ४४एडीए अंतर्गत मिळालेल्या सेवाशुल्काच्या ५० टक्के रक्कम उत्पन्न गृहीत धरण्याची सुसंधी या ‘आयटीआर-४’मध्ये उपलब्ध करून देण्यात आली असल्याने मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकर वाचणार आहे.सोर्स दै. सकाळ न्यूज