जाणून घ्या कवडीची किंमत
एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मिळ झाली आहे. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती. चलन उदयास येण्यापूर्वी सर्व व्यवहार (एक्सचेंज) बार्टरच्या रुपात होते. म्हणजे एखाद्याकडे दोन पोते गहू असतील तर ते देऊन त्याने दुसऱ्याकडचे तांदुळ घेणे म्हणजे वस्तू विनिमय. पुढे व्यवहारात चलन आले. मुगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८ पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता.
कवडी चलनात आल्यानंतर जनजीवनात इतकी रुळली की त्यावरुन वाक्प्रचार आणि म्हणीही तयार झाल्या. तेव्हापासून अत्यंत कंजुस व्यक्तीला कवडी चुंबक संबोधले जाऊ लागले. सगळ्यात कमी मूल्याचे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती.
पूर्वी कवड्या आणि चांदी हेच विनिमयाचे साधन होते. नंतर अनेक टांकसाळी अस्तित्वात आल्या. सध्या भारतात मुंबई, अलिपूर(कोलकता), हैद्राबाद आणि नोएडा (दिल्ली) या ठिकाणी टांकसाळ आहेत. विनिमयाचे साधन म्हणून तेव्हा केवळ नाणेच चलनात होते. त्यावरुन "दाम करी काम" हा वाक्प्रचार अस्तित्वात आला.
जाणून घ्या कवडीची किंमत
एका चांगल्या कवडीची किंमत तीन फुटक्या कवड्या होती.
दहा चांगल्या कवड्यांची किंमत एक दमडी होती.
चार दमड्यांची किंमत एक पै,
दोन दमड्यांची किंमत एक ढेला,
दोन ढेल्यांची किंमत पैसा अशी होती.
एक रुपयाची किंमत २५६ दमड्या होती.
"पै ना पै चा हिशोब देणे"
‘'खिशात फुटकी कवडी नाही'’
हे वाक्प्रचार तेव्हापासून रूढ झालेले आहेत.
✍️ संदिपान नामदेवराव कोकाटे
रा. निपाणी ता. भूम
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.