नवी दिल्ली, 04 जुलै : बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एफडी (FD Fixed Deposit) केली असेल तर तुम्हाला 15G आणि 15H फॉर्म जमा (TDS) करणे अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून टीडीएस कापून घेतला जाईल. या फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 7 जुलै आहे. हे दोन्ही फॉर्म करापासून वाचण्यासाठी असे करदाता भरतात जे टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे लोकांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यां लक्षात घेता बँकेच्या ठेवीदारांना देखील दिलासा दिला आहे. ठेवीदारांना एफडीवर देय व्याजदरावरील टीडीएसवर सूट मिळावी याकरता 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म भरावा लागतो. आयकर विभागाने हा फॉर्म भरण्याची तारीख 7 जुलै पर्यंत वाढवली आहे. जर ठेवीदारांनी हा फॉर्म नाही भरला तर बँकेकडून व्याजाच्या रकमेवर 10 टक्के टीडीएस कापण्यात येतो.
15G आणि 15H फॉर्म जमा (TDS) करणे अनिवार्य
लोकमत न्यूज
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.