ट्रेडमार्क नोंदणी उपयुक्त माहिती
लोगो डिझाईन करून झाल्यावर महत्वाची पायरी म्हणजे ब्रँड नेम व लोगो, ट्रेड मार्क करून घेणे. ट्रेड मार्क नोंदणीचे अप्रूव्हल येण्यासाठी किमान दोन वर्षे लागतात.
ट्रेड मार्क नोंदणीकरि ता व्यवसायाच्या प्रकारानुसार शासकीय शुल्क आहे. हे शुल्क रु. ४५००/- पासून सुरु होते.
परंतु ट्रेड मार्क नोंदणीसाठी शक्यतो एखादी अधिकृत एजन्सी निवडावी. यासाठी काही शुल्क द्यावे लागते पण तुमचा ट्रेड मार्क योग्य प्रकारे नोंदणीच्या मार्गे जातो.
ट्रेड मार्क नोंदणीसाठी घेतले जाणारे शुल्क हे वेगवेगळ्या भागात विभागले जाते. ट्रेड मार्क नोंदणीसाठी कुठेही शोध घेतला तरी प्रत्येकाकडून नेहमीच ६-७ हजार रुपये शुल्क सांगितले जाते. परंतु हे शुल्क फक्त ट्रेड मार्क अप्लिकेशन च्या फाईलींग साठीचे असते. यात ट्रेड मार्क ची पूर्ण प्रक्रिया येत नाही. हि प्रक्रिया करण्यासाठी नंतर वेगळे शुल्क सांगितले जाते. हे शुल्क रु. १० हजारापासून १५-२० हजार रुपयांपर्यंत असू शकते. थोडक्यात कोणताही ट्रेड मार्क नोंदणीसाठी किमान १५-१६ हजार खर्च हा येताच असतो.
हे अतिरिक्त १०-१५ हजार रुपये शुल्क ट्रेड मार्क अप्लिकेशन फाईलींग नंतर कराव्या लागणाऱ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी असते. फक्त अर्ज केला म्हणजे तुमचा ट्रेड मार्क नोंदवला जात नाही. या अर्जानंतर तुमच्या ट्रेड मार्क वर काही आक्षेप येतात, तसेच ट्रेड मार्क अथॉरिटी कडून काही शंका उपस्थित केल्या जातात. यासाठी एका प्रतिनिधीला ट्रेड मार्क कार्यालयात तुमच्या वतीने हजार राहणे आवश्यक असते. हि हजेरी किमान २-३ वेळा आवश्यक असते. जर असा कुणी प्रतिनिधी किंवा तुम्ही कार्यालयात आपले म्हणणे सादर केले नाही तर अर्ज नामंजूर केला जातो. हि कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला करणे शक्य नसते, यासाठी तुम्हाला अधिकृत IPR कन्सल्टन्ट कडेच जावे लागते, आणि ते या प्रोसेस साठी त्यांचे शुल्क घेत असतात. थोडक्यात कुणी कितीही ५-६ हजारात ट्रेड मार्क नोंदवून देतो म्हणाला तरी त्यावर विश्वास ठेऊ नका, उलट तो तुमचा फक्त अर्ज करेल, पण त्यांनंतरची काहीही कार्यवाही करणार नाही, आणि याचा फटका तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला बसेल. ट्रेड मार्क नोंदणीच्या पूर्ण प्रक्रियेसाठी किमान १५-१७ हजार खर्च येतो हे लक्षात ठेऊन चला. पण याचबरोबर हा खर्च केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नसते. कारण तोपर्यंत तुमचा ब्रँड धोक्यात असतो.
कमी शुल्काच्या (दरात) नादाला लावून सध्या बऱ्याच व्यवसायिकांची फसवणूक करण्याचे काम चालू आहे म्हणून या विषयावर थोडे जास्त लिहिलेले आहे.
ट्रेड मार्क साठी अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमच्या लोगो सोबत TM असे लिहू शकता व ट्रेड मार्क मंजूर झाल्यानंतर R लिहिता येतो. कोणतेही अप्रूव्हल नसताना लोगोसोबत R लिहिलेले असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे असे धाडस करू नका.
हि आहे ट्रेड मार्क ची कहाणी. सोप्या भाषेत माहिती सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. ही गोष्ट/ माहिती तुमच्या व्यवसायासाठी अतिशय महत्वाची आहेत. यासाठी खर्च येतो हे जरी मान्य केले तरी त्यामुळे मिळणारे फायदे कितीतरी पटींनी मोठे असतात हेही सत्य आहे. व्यवसाय साक्षरतेच्या या मोहिमेत मी स्वतः या बाबींवर जातीने लक्ष ठेवतो. माझ्या सर्व क्लायंट्स ला, मित्रांना या बाबींची योग्य पूर्तता करण्यासाठी नेहमीच प्रवृत्त करतो. याचे कारण काय आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल..!
तुम्हांला देखील स्वतः च्या व्यवसाय किंवा उद्योगाला ट्रेड मार्क करायचे असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा.
श्याम मोतीराम आवारे
स्वराज बिझनेस हब
मराठा अर्थक्रांती
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.