मिखाईल गोर्बाचेव्ह.. हे रशिया चे एके काळचे प्रेसिडेंट होते.. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेली एक गोष्ट..
दुसऱ्या महायद्धानंतर च्या काळात ते इंग्लंड येथे शिकत होते.. तेव्हा त्यांच्या बरोबर दोन जापनीज विद्यार्थी पण शिकायला होते.. युध्दात जपान चे अतोनात नुकसान झाले होते.. आणि अनेक निर्बंध पण त्यांच्या वर लाधले गेले होते..
त्या दरम्यान.. दोन जापनीज विद्यार्थी जेव्हा नोट्स काढायचे तेव्हा ते जपान मेड निकृष्ट क्वालिटी ची पेन्सिल वापरायचे.. आणि त्या पेन्सिल चे टोक नोट्स काढता काढता अनेकदा तुटायचे.. त्या मुळे एक विद्यार्थी नोट्स लिहीत असे.. आणि दुसरा सतत पेन्सिल शार्प करत असे..
बरोबर शिकणारे अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना अनेकदा आग्रह केला की.. तुम्ही इंग्लंड मेड उत्कृष्ट क्वालिटी ची पेन्सिल वापरा.. म्हणजे तुम्हाला असा त्रास होणार नाही.. पण अनेकदा सांगूनही ते फक्त आणि फक्त जापनीज मेड पेन्सिलच वापरायचे.. त्यांचं म्हणणं होतं की.. आम्हीच जर आमच्या देशातील वस्तू विकत घेतल्या नाहीत आणि वापरल्या नाहीत.. तर दुसरे कोण वापरणार.. आणि ते विश्वासाने सांगायचे की एक ना एक दिवस असा येईल की सगळं जग आमचे क्वालिटी प्रॉडक्ट्स वापरतील..
आता आपली पाळी आहे.. भारतीय वस्तू वापरण्याची.. वेळ लागेल.. पण निश्चितच भारत बलवान होईल..
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा
Your massage recorded.